रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दिंडोशी महिला विभागाच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती
मालाड/वैशाली जाधव
मालाड (पु) भीम नगर येथील धम्मगिरी बुद्धविहार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिंडोशी तालुका महिला विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती व महिलांचे हळदी कुंकू असा दुहेरी कार्यक्रम भारतीय प्रजासत्ताकाच्या पूर्व संध्येला संपन्न झाला. यावेळी रिपाईच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमाताई रामदास आठवले ह्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभया ताई सोनावणे, मुंबई अध्यक्षा उषाताई रामलू, जिल्हा अध्यक्षा रेश्माताई खान, सुधारणाताई मिसळे, वंदनाताई बोराडे आदि महिलांची प्रमुख उपास्थिती होती. यावेळी सीमाताई आठवले म्हणाल्या की दिंडोशी विधान सभा आर.पी.आय महिला विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेतलें जातात याबद्दल सर्व महिलांचे अभिनंदन. येत्या दोन मार्च रोजी नाशिकच्या काळा राम मंदिर या ठिकाणी पक्षाच्या वतीने जागतिक धम्म परिषद आयोजित करण्यात येणार आहे या परिषदेला मोठ्या संख्येने उपास्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमात महिलांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिंडोशी तालुका अध्यक्ष संजय बोराडे यांनी केले.
—————————————-