कोकणातील सौंदळ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म बांधण्याची मागणी
माजी रेल्वे मंत्री मधु दंडवते यांच्या अथक प्रयत्नांनी कोकण वासीयांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र सौंदळ रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म नसल्या कारणाने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकरिता सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला 2019 रोजी पत्रव्यवहार केला होता. मात्र अद्याप कार्यवाही झाली नाही. असा आरोप होत आहे. तसेच सौदळ येथे सावंतवाडी पॅसेंजर व्यतिरिक्त कोणतीच गाडी थांबत नाही . साधारणता या रेल्वे स्थानकाच्या जवळील 60 ते 70 गाव या स्थानकाशी जोडले गेले आहेत.कोकणातील सौंदळ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.