शेवंतीबाई जयराम जाधव यांचे निधन

संघामित्रा महिला ग्रामीण मंडळाच्या माजी अध्यक्षा शेवंतीबाई जयराम जाधव (येळवणकर) यांचे निधन
मालाड/प्रतिनिधी
संघामित्रा महिला मंडळ, येळवण (ग्रामीण ) च्या माजी अध्यक्षा शेवंतीबाई जयराम जाधव यांचे वयाच्या 80 व्या वर्षी नालासोपारा येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे दोन मुली, दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे. येळवण बौध्दजन विकास मंडळाचे सभासद प्रकाश जयराम जाधव व प्रदीप जयराम जाधव यांच्या त्या आई होत्या तर संघामित्रा महिला मंडळ, मुंबईच्या अध्यक्षा प्रियंका प्रदीप जाधव यांच्या त्या सासूबाई होत्या. स्मृतिशेष शेवंतीबाई जयराम जाधव ह्या शांत आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. राजापूर तालुक्यातील मौजे येळवण हे त्यांचे मूळ गाव आहे. सद्या त्या नालासोपारा (प ) मध्ये त्या राहात होत्या. त्यांचा जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम नालासोपारा (प )शालिभद्र हौसिंग सोसायटी, मदर मेरी शाळेजवळ त्यांच्या राहत्या घरी रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा. होईल असे बौ. पं समिती शाखा क्र 772 व येळवण बौध्दजन विकास मंडळ, मुंबई यांनी कळविले आहे.
——————————————–




