अपरिचित इतिहास

संत ज्ञानेश्वर महाराज जयंती निमित्त कार्यक्रम

जिजामाता विद्या मंदिर शाळेचा स्तुत्य उपक्रम

*ज्ञानेश्वरी पठण सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अभिनव उपक्रम*
जिजामाता विद्या मंदिर मालाड पूर्व या शाळळेचे सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ वी जयंती निमित्त “ज्ञानेश्वरी पठण “अभिनव उपक्रम कुरागाव शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मकरंद श्रीधर वर्तक साहेब,श्री सचिन हरीष कदम साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. जान्हवी दिलीप सावंत मॅडम यांच्या पुढाकाराने सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात सकाळ वर्तमानपत्राचे मुंबई उभागाचे उपसंचालक श्री.जयवंत चव्हाण साहेब तसेच मुख्य व्यवस्थापक सामाजिक उपक्रम विभाग श्री दिनकर साहेब, स्थानिक समन्वयक श्री.भाले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत जवळपास ५३८ विद्यार्थी तसेच त्यांचे पालक आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनघा अविनाश साळकर मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमानिमित्त ज्ञानेश्वरी उलगडणारी माहिती कुमारी रागी मोरे ,कुमारी समृद्धी चव्हाण, कुमारी कोमल नाईक, कुमारी वेदिका सावंत, कुमारी साक्षी सुर्वे , कुमारी जानकी जाधव या विद्यार्थ्यांनी सांगितली तसेच ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत कुमारी सौम्या शशिकांत शिर्के तर वारकरीच्या भुमिकेत कुमार हर्ष जितेंद्र पवार आणि त्याचे साथीदार वेशभूषेमध्ये नटून थटुन आले होते. ज्ञानेश्वरांनी सांगितलेले जीवनउपयोगी विविध कलांची माहिती विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमधून मराठीत अनुवाद करत सर्व श्रोत्याला मंत्रमुग्धकरणारे प्रामुख्याने गुरुभक्ती, एकाग्रता, श्रवण कसे करावे ,आत्मविश्वास, कसे बोलावे , अभ्यास, मुलांची पारिवारिक कर्तव्य ,पालकांनी घ्यावयाची काळजी, उत्तम आहार अशा विविध ओव्या सादर केल्या त्यासाठी त्यांना जिजामाता शाळेतील शिक्षकांनी उत्तम रित्या मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पसायदानाचा अर्थ स्पष्ट करून सांगण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पालकांनी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सौ. समिधा शशिकांत शिर्के यांनी शाळेतील मुलांना ज्ञानेश्वरांच्या ओव्या म्हणजेच शुद्ध भाव आणि स्वच्छ स्वभाव यांचे महत्त्व सांगितले शालेय वयो गटासाठी ज्ञानेश्वरांच्याओव्या या अमृता समान आहेत.असे मत व्यक्त केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सावंत मॅडम यांनी या कार्यक्रमाविषयी आपले बोलके मत व्यक्त केले त्यांनी संतांची शिकवण ही आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील आणि त्यांचे प्रत्येक कार्य हे आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणयचे आहे हे समजून सांगितले व सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.प्राजक्ता जयसिंग आंब्रे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अमृत वाणीतून प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचं अस्तित्व असतं तसेच आपलेआचरण शुद्ध असावे असे मुलांना ठणकावून सांगितले.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक रित्या पसायदानाचे गायन केले. विद्यार्थ्याला दैनंदिन अध्ययन अध्यापना व्यतिरिक्त एक संस्कृतीची जडणघडण आणि संतांचे उपदेश ऐकण्याची नामी संधी या कार्यक्रमानिमित्त लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button