महाराष्ट्र ग्रामीण

सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाघमारे पुन्हा रिप. सेनेत

उत्तर मुंबई प्रमुखपदी नियुक्ती

सुरेश वाघमारे यांचा रिपब्लिकन सेनेत पुन्हा प्रवेश

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सुरेश वाघमारे यांची उत्तर मुंबई जिल्हा प्रमुख पदी निवड

मुंबई विशेष प्रतिनिधी

उत्तर मुंबई जिल्ह्यातील मालाड विधानसभेत राहणारे पत्रकार युवा तरुण आंदोलक नेतृत्व सुरेश शिवाजी वाघमारे यांचा आजाद समाज पार्टी मधून रिपब्लिकन सेनेत नुकताच पक्ष प्रवेश झाला,

सुरेश वाघमारे हे चंद्रसेखर आजाद यांच्या नेतृवावर प्रभावित होऊन भीम आर्मी, आजाद समाज पक्षात उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदावर काम करत होते मात्र पक्षातील गटबाजीला कंटाळून.विश्वरत्न. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला,

वाघमारे यांनी यापूर्वी रिपब्लिकन सेनेत उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदावर सलग 6 वर्ष काम केलेले असून उत्तर मुंबई जिल्ह्यात मोर्चे आंदोलन करून सामाजिक राजकीय समस्या सोडविण्यासाठी अविरत पणे कार्य केले असून, यापुढेही रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत काम करणार असल्याचे मत सुरेश वाघमारे यांनी दादर येथील आंबेडकर भवन येथे बोलताना व्यक्त केले, महानगर पालिका निवडणूकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सत्तेत दहा टक्के वाटा या समीकरणात आम्ही शिवशक्ती भीमशक्ती ला गतिमान करणार आहोत अशी भूमिका वाघमारे यांनी मांडली

कामाचा अनुभव बघता सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी, वाघमारे यांना पुन्हा उत्तर मुबंई जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती दिली असून येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन सेनेचे नगरसेवक निवडून येतील असे संघटनेचे पक्षाचे काम बांधणी करावी असे सूचित केले,

यावेळी पक्ष प्रवेश करते वेळी युवकांचे नेतृत्व आंबेडकरी घराण्याचे युवराज ऍड अमन आंबेडकर साहेब
. राष्ट्रीय सरचिटणीस संजीवजी बोधनकर, महाराष्ट्र सचिव विनोद काळे.यांच्या मार्गदर्शना खाली व मुबंई प्रदेश अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे, मुबंई प्रदेश सरचिटणीस गजानन तांबे. मुबंई संघटक राजेश शिनगारे.रिपब्लिकन विध्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष ऍड आशिष गाढे, युवा सेनेचे बाबासाहेब गायकवाड, कार्याध्यक्ष भीमराज जगताप, यांच्या नेतृत्वामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला वाघमारे यांच्या समवेत जितेंद्र वाघमारे, दिनेश देवमोरे, रितिक शर्मा, अक्की ओव्हाळ, सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते सुरेश वाघमारे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन स्वागत होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button