
संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन सेनेमार्फत संविधान संवाद कार्यक्रम
आपली महासत्ता / प्रतिनिधी
मालाड (पू ) कुरार व्हिलेज येथील बुद्ध विहारात रिपब्लिकन सेना दिंडोशी तालुका आयोजित संविधान संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बौद्ध समाज सेवा संघांचे कार्यक्रते अनिल कडरे, संदीप कडरे व धनराज बाविस्कर यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या. बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची शुरुवात झाली. यावेळी कुरार गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय खरात, रिपब्लिकन सेना उत्तर पश्चिम जिल्हा सचिव व दिंडोशी तालुका प्रभारी चंद्रशेखर जाधव, बौद्धाचार्य मारुती ओव्हाळ आदिची संविधानावर आधारित भाषणे झाली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनीही आपले विचार मांडले. सदर बुद्ध विहारात प्रत्येक आठवड्यात संविधानावर आधारित चर्चासत्र आयोजित करण्यात येईल असेही ठराविण्यात आले. रिपब्लिकन सेनेमार्फत कुरारमधून कार्यक्रम कारण्याबाबतही ठराविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. आणि कार्यक्रमाची सांगता झाली.



