अपरिचित इतिहास

रिपब्लिकन सेनेचा 11 वा. वर्धापन सोहळा संपन्न

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

रिपब्लिकन सेनेचा 11 वा. वर्धापन दिन सोहळा

आनंदराज आंबेडकर साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर

आपली महासत्ता

तिनिधी/जय जाधव

ठाणे: सामाजिक समता आणि संवैधानिक मूल्यांसाठी कार्यरत असलेल्या  रिपब्लिकन सेना पक्षाचा 11 वा वर्धापन दिन सोहळा ठाणे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या सोहळ्याला *रिपब्लिकन सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब हे उपस्थित होते.रिपब्लिकन सेनेच्या 11 वर्षांच्या वाटचालीचा आढावा या कार्यक्रमात घेण्यात आला. मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांनी यावेळी आंबेडकरी चळवळीतील तळागाळातील कार्यकर्त्याला सत्तेत बसवण्याचा संकल्प केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रिपब्लिकन सेना व शिवसेना हे दोन मित्र पक्ष एकत्रित लढवणार असून यश खेचून आणणार असल्याचे जाहीर केले.तर मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी “हमको नही है किसीका डर, क्योंकी हमारे साथ है आनंदराज आंबेडकर”…असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीत रिपब्लिकन सेनेला 10% जागा देण्याचे मान्य करित सामाजिक न्याय आणि लोकशाही बळकट करण्याच्या संकल्प बोलून दाखविला.यावेळी रिपब्लिकन सेनेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button