
मालाडमधिल जरीमाता मंदिर बिल्डरांच्या घशात -मंदिर बचाव समितीची निदर्शने
आपली महासत्ता – विशेष प्रतिनिधी
मालाड (पू ) कुरार व्हिलेज हाय वे जवळ असलेले सन 1960 पूर्वी प्रस्थापित झालेले जरी माता मंदिर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून मंदिर बचाव समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली असून यात मंदिर पुजारी, स्थानिक कार्यकर्ते, आर. पी. न्युजचे मुख्य संपादक राजेश पांडे, पत्रकार दीनानाथ तिवारी, ऍडव्होकेट यादव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. जरीमाता देवी फार जागृत असून देवीच्या विरोधी कोणी गेले तर खापवून घेतले जाणार नाही असे येथील रहिवाशांनी बिल्डरला ठणकावून सांगितले आहे. तर जानू भोये नगर मधिल 14 सार्वजनिक मंदिरे ओंकार बिल्डरने दखल न घेतल्याने दुर्लक्षित राहिली आहेत. यांचा विचार झाला पाहिजे असे राजेश पान्डे म्हणाले. या आंदोलनात आमदार बच्चू कडू यांचे समर्थकही सहभागी झाले होते. तर जो पर्यंत ओंकार बिल्डर त्याच ठिकाणी मंदिर बांधून देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
- —————————————————————-/—-




