खेळ

कांदिवलीत बाल दिन उत्साहात साजरा

ये क्यू एम संस्थेचा उपक्रम

कांदिवलीच्या दामू नगरात बालक दिन साजरा

कांदिवली/प्रतिनिधी

कांदिवली (पू ) दामू नगर येथील सातारा कॅम्प मध्ये बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदर ठिकाणी राहणाऱ्या मुलांसाठी AQM Foundation मार्फत गेल्या 5 वर्षांपासून मोफत क्लासेस घेण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मुलांना एक वेळचे मोफत जेवण दिले जाते. तसेच जी मुलं शाळेत जात नाहीत अशा मुलांचे प्रवेश (Admission) करून देणे व शाळेची पूर्ण फी भरून देण्याची जबाबदारी संस्थेद्वारे पार पाडली जाते.
बालक दिन निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांसाठी विविध बुद्धिमत्ता वाढविणारे खेळ आणि Activity Games घेण्यात आले. यात मुलांनी आनंदाने सहभाग घेतला. खेळता-खेळता, हसत-शिकत त्यांच्यात शिक्षणाबद्दल सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आले.
या उपक्रमामध्ये जीतेश शरणागत, शिक्षिका वर्षा शरणागत आणि मनीषा कटरमल मनापासून कार्यरत असून मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर अति उत्साह दिसत होता.
———————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button