Vijay Wadettiwar: एकनाथ शिंदेंची महायुतीला गरज नाही, शिवसेनेला संपवण्यासाठी आता नवा ‘उदय’ होईल; विजय वडेट्टीवारांनी महायुतीला डिवचलं

Vijay Wadettiwar on Mahayuti : उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपून नवीन ‘उदय’ पुढे येईल. असे भाकीत करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
Vijay Wadettiwar नागपूर : नाराजी दाखवून आपल्या पदरात काही मिळेल का, हा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. शिंदे (Eknath Shinde) यांची गरज संपली का? ते बाजूला व्हावे अशी भीती आहे. उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल. ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे. किंबहुना उद्याचा शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल, ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही तबल्यावर हात मारून आहेत. संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहे. असे भाकीत करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावाला रवाना झाले आहेत. वैयक्तीक कारणासाठी चार दिवस ते दरे गावी रवाना झाल्याचं बोललं जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा आहे. या विषयी बोलताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य करत टीका केली आहे.