
सायन कोळीवाडा येथील पंचशील नगरमध्ये प्रजासत्ताक दिनी महिला मेळावा संपन्न
प्रतिनिधी/ वैशाली जाधव
मुंबई सायन कोळीवाडा येथील पंचशील नगरात दि. 27 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्रपाली महिला महिला मंडळ यांच्या वतीने सावित्रीमाई फुले आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक महिलांचा मेळावा घेण्यात आला. या महिला मेळावा प्रसंगी पंचशील नगर नंबर १,२,३ आणि सावित्रीबाई फुले वसाहत या नगरातील सुमारे २००पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या निमित्ताने सहभागी महिलांना भेटरूपी वस्तूचे वाटप करण्यात आले.सदर महिला मेळाव्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे व्याख्याते प्रतीक पवार (करुळकर) यांचे व्याख्याण झाले. या व्याख्यानामध्ये त्यांनी असे प्रतिपादन केले की ज्योतिबांच्या सोबत आणि नंतरही सावित्रीमाईंनी चालवलेला शिक्षणाचा वसा आणि माता रामाईंचा त्याग आणि करूणे पलीकडचा लढा जोपर्यंत महिलांना सांगितला जात नाही, तोपर्यंत महिलांना खऱ्या सावित्रीमाई आणि खरी रमाई कळणे कठीण होऊन जाईल. म्हणून स्त्रियांनी घर सांभाळताना सामाजिक प्रवाहात झोकून दिले पाहिजे.महिला सुशिक्षित आणि प्रतिभाशाली बनल्या पाहिजेत. ही काळाची गरज असल्याचे प्रतीक पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी धनश्री ध.जाधव होत्या तर सूत्रसंचालन सरचिटणीस अस्मिता प्र. पवार यांनी केले. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी आम्रपाली महिला मंडळ कार्यकारिणीने मेहनत घेतली. त्याचबरोबर स्थानिक बौद्धजन पंचायत समितीचे प्रशांत जाधव व पंचशील सोसायटीचे बबन राजापकर यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केल्याचे दीपक जाधव यांनी सांगितले.
- ————————————————————–