परभणी नंतर आता मालाडच्या आंबेडकर नगर मध्ये बाबासाहेबांचा अपमान व विटंबना
मालाड/ प्रतिनिधी।
मालाड (पु) डॉ. आंबेडकर नगर येथे दोन महिला व एक पुरुष यांनी मिळून जातीवादाच्या भावनेने दि. 7/01/2025 रोजी बाबासाहेबांचा फोटो असलेला बॅनर फाडला तसेच 8/1/2025 रोजी सदर घटना पाहणाऱ्यांना धमकावले व मारहाण केली याबाबत कुरार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाची नोंद घेण्यात आला व आरोपीचा बचाव केला गेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर महिला आरोपीने सांगितले की बॅनर मे हमारे दुश्मन का फोटो है असे बोलू बाबासाहेबांना व दलित लोकांना दुश्मन म्हणून समजून अपमान केला. सदर घटनेनंतर कार्यकर्त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसानी अदखलपात्र गुन्हा नोंद केली. सदर प्रकरणातील आरोपी अंजली शर्मा, ज्योती पटेल, गौतम विश्वकर्मा यांना सोडून दिले. याचा फायदा आरोपीने घेतला त्यानंतर सदर प्रकरण वाढत गेल्याने आरोपीने स्वतःच्या बचावा करीता फिर्यादी दलित कार्यकर्ता विरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ वकील नितीन सातपुते व वकील दिपक जगदेव यांच्या मदतीने दि 15/1/2025 रोजी सदर आरोपी विरुद्ध गु. क्रं. 58/2025 ऍक्ट्रोसिटीनुसार गुन्हा नोंद झाला…तात्काळ पोलीसाने आरोपीला अटक केली नाही. परत आरोपीला मदत केली त्याचा फायदा घेवून आरोपी मोकाट फिरत होते तेव्हा परत फिर्यादीच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. अद्याप आरोपीना अटक झाली नाही. आंबेडकरी समाजाच्या वतीने देश देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वारंवार होत आहे तसेच या पाठमागे वैभव भरडकर असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबासाहेबांचा बॅनर फडल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.आंबेडकर नगर कुरार येथील बाबासाहेबांची विटंबना प्रकरणात मास्तर माईंड वैभव भरटकर याचाच हात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश शिंदे यांनी आरोप केला आहे. वैभव भरडकर यांना आरोपी करून सखोल चौकशीची मागणी अविनाश शिंदे यांनी केले आहे.
- —————-;—————————परभणी नंतर आता मालाडच्या आंबेडकर नगर मध्ये बाबासाहेबांचा अपमान व विटंबना

—————-;—————————