आस्था परिवार होसला प्रकल्प आयोजित युवा संमेलन संपन्न
युवतीनी केला प्रश्नांचा भडिमार
मालाड/चंद्रशेखर जाधव
मालाड (प) म्हाडा मालवणी येथिल बँकवेट हॉलमध्ये आस्था परिवार होसला प्रकल्प आयोजित युवा संमेलन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला उपनगर जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश सतीश हिवाळे, मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, डब्लू.सी.डीचे प्रोटेक्शन अधिकारी निलेश गवई, सी.सी.डी.टीचे किरण सुर्वे व अमित, मालवणी आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ अक्षदा पाटील, डॉ भक्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेच्या डायरेक्टर सीमा सय्यद यांनी केले. प्रोजेक्ट मॅनेजर सुनीता चोहान, युवा कौन्सिलर कांचन चव्हाण आस्था परिवार सदस्या साईदा बेग आणि आसमा पटेल यांनीही सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला मालवणीतील युवा व युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.मालवणीतील युवा वर्ग संस्थेला जोडला गेला आहे. संस्थेच्या कामात सहकार्य करणाऱ्या लिडर्सना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाचे न्यायाधीश सतीश हिवाळे यांनी विधी प्राधिकरणामार्फत केली जाणारी कामे उपस्थितांना सांगितली. तर मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी युवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मालवणीतील विविध समस्यांवर युवतींनी प्रश्नांचा भडिमार केला. तसेच पोलिसांमार्फत होणाऱ्या कार्याची माहिती दिली. सदर कार्यक्रम युवकांच्या प्रश्नांनी गाजला. आस्था परिवाराच्या उपक्रमांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
—————————————–आस्था परिवार होसला प्रकल्प आयोजित युवा संमेलन संपन्न

—————————————–